'शिवसेनेला नडला तो पडला'

Sewri
'शिवसेनेला नडला तो पडला'
'शिवसेनेला नडला तो पडला'
See all
मुंबई  -  

शिवडी - शिवसेनेच्या ताकदीचा एक वेगळा इतिहास असून आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांसारखे विरोधी पक्ष नडले आणि शिवसेनेसमोर पडले. हा अखेरचा भाजपा मित्र पक्ष राहिला आहे, जो गोड बोलून आपली शत्रूता दाखवत आहे. त्याला सुद्धा शिवसेने पुढे हार मानावी लागणार असल्याची टीका आमदार अजय चौधरी यांनी केली. युती झाल्यास हा पक्ष शिवसेनेच्या चांगल्या नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न येत्या निवडणुकीत करेल. यासाठी अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्येक शिवसैनिकांनी गाफील राहण्याची गरज आहे, असा सल्ला चौधरी यांनी दिला. शिवडी पश्चिम येथील शिवसेना नगरी समोरील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांचा मेळावा आणि शिवबंधन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय. या वेळी विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, उपविभाग प्रमुख विलास राणे, नगरसेविका किशोरी पेडणेकर, श्वेता राणे, नगरसेवक नंदू विचारे, रचना अगरवाल, सिंधू मसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.