Advertisement

भाजपाच्या विजयी मिरवणूक रॅलीला शिवसेनेचा विरोध


भाजपाच्या विजयी मिरवणूक रॅलीला शिवसेनेचा विरोध
SHARES

गोरेगाव - भाजपाचे विजयी उमेदवार दीपक ठाकूर आणि श्रीकला पिल्ले यांच्या विजयी मिरवणूक रॅलीला शिवसेना कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. रविवारी ही मिरवणूक होणार होती. मात्र शिवसेना कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवल्याने पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून मिरवणुकीला परवानगी नाकरली.

रविवारी 4 वाजात भाजपातर्फे विजयी मिरवणूक रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र मिरवणूक होऊ देणार नाही. 'गोरेगावमध्ये झालेले मतदान बोगस आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आमचीच मिरवणूक निघणार' अशी धमकी शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिली. दरम्यान याबाबत भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीकला पिल्ले यांनी आमची मिरवणूक रॅली रविवारी होती पण पोलिसांनी परवानगी दिली नाही, त्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला. पण पुढे दोन दिवसांत मिरवणूक होणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा