गृहिणींना दिवाळी भेट

 Pali Hill
गृहिणींना दिवाळी भेट

कुलाबा - वाढत्या महागाईची झळ दिवाळीत सहन करावी लागू नये, म्हणून दक्षिण मुंबई शिवसेनेच्या वतीने गृहिणींना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. प्रत्येकी 1 किलो रवा, मैदा, साखर, चणाडाळ, आणि पोहे यांचं पाकिट फक्त दीडशे रुपयांत उपलब्ध करून देण्यात आलं. या उपक्रमासाठी शिवसेना सचिव अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, उपनेत्या मीना कांबळी व विभागसंघटक सुरेखा परब आदींनी पुढाकार घेतला.

Loading Comments