मुंबई महापालिका घोटाळ्याचे आगर - मुख्यमंत्री


SHARE

चिंचपोकळी - महानगरपालिकेत गेल्या 25 वर्षांत रस्ते कंत्राट घोटाळा, कचरा घोटाळा आणि नालेसफाई घोटाळा असे अनेक घोटाळे झाले आहेत. या मुंबईत जी घोटाळ्यांची मालिका सुरू आहे त्यामुळे मुंबई महापालिका घोटाळ्याचे आगर झाले आहे, असे आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केले. ते चिंचपोकळी येथील हिंदमाता लेन येथे झालेल्या सभेत बोलत होते.

पंचवीस वर्ष सत्तेत राहून आम्ही करून दाखवलं म्हणतात मात्र काय केलं हे सांगता येत नाही म्हणून मोदी, देश, नोटा अश्या मुद्यावर भाषण करून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतात⁠⁠⁠⁠, अशी टीका मुखमंत्र्यांनी शिवसेनेवर केली. या सभेत शिवसेनेचे दोन शिलेदार अमर पावले आणि नाना आंबोले ज्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आता परिवर्तन करण्याची वेळ आली आहे, देशात राज्यात जिल्ह्यात भाजपाचं सरकार आलं पाहिजे, तेव्हाचं आपल्याला पारदर्शी सरकार आणता येईल. म्हणून कमळालाच मत द्या असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनतेला केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या