गेला प्रस्ताव कुणीकडे?

    मुंबई  -  

    वांद्रे - एकीकडे सेना-भाजपाच्या युतीबाबत बैठकांवर बैठका होतायत...भाजपकडून जागांबाबत दावे केले जात आहेत..मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतायत की त्यांच्याकडे अजून युतीचा प्रस्तावच आलेला नाही...त्यामुळे युतीचा प्रस्ताव नक्की गेला कुठे असा प्रश्न सामान्य मुंबईकरांना पडलाय. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुंबईकरांना ज्याप्रकारे खूश करण्याचा प्रयत्न केला तसेच ठाणे आणि उल्हासनगर शहरातील रहिवाशांना देखील खूश करण्याचा प्रयत्न केला. ठाणे आणि उल्हासनगरमधील 500 स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर मुक्त करणार असल्याचे वचन त्यांनी दिले. तसेच मुंबईप्रमाणेच ठाण्यातही आरोग्य कवच योजनाही राबवण्यात येणार आहे. मुंबईतील बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बेस्टचा मोफत प्रवास योजना राबविणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. ठाणे महापालिकेसाठी नवीन धरण बांधण्यात येणार आहे. ठाण्यात आंतराष्ट्रीय पातळीचे सेंट्रल पार्क बांधणार येणार असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.