शिवडीमध्ये ज्येष्ठांच्या मतदानासाठी खुर्चीचा वापर

 Sewri
शिवडीमध्ये ज्येष्ठांच्या मतदानासाठी खुर्चीचा वापर
शिवडीमध्ये ज्येष्ठांच्या मतदानासाठी खुर्चीचा वापर
शिवडीमध्ये ज्येष्ठांच्या मतदानासाठी खुर्चीचा वापर
See all

शिवडी - आचार्य दोंदे मार्गावरील बारादेवी मनपा शाळेत प्रभाग 202 मधील उमेदवारांनी मतदान केले. मात्र, सदरील मनपा शाळा ही टेकडीवर असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांच्या सेवेसाठी महापालिकेचे चार कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. परंतु ती व्यवस्था पुरेशी ठरली नाही. एफ दक्षिण विभागाचे हे कर्मचारी ज्येष्ठ, रुग्ण आणि अपंग अशा नागरिकांना एका खुर्चीवर बसून जिना चढून वर घेऊन जात होते. मात्र शाळा किंवा मतदान केंद्र तळमजल्यावर असते तर खूप बरे झाले असते अशा शब्दांत काही ज्येष्ठ मतदारांनी नाराजी व्यक्त केली.


दरवर्षी सदरील शाळा मतदान केंद्र म्हणून येते. त्यामुळे या केंद्रावरच मतदान करण्यासाठी यावे लागते. पण ही शाळा टेकडीवर असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात. यंदा मला पॅरालिसिसचा अॅटॅक आल्याने मी जिना चढू शकत नाही. पण मतदान करणं कर्तव्य असल्याने मी मतदान केलं. यासाठी पालिकेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.  -  राजाराम उतेकर (वय 70)


 

Loading Comments