Advertisement

राष्ट्रवादीचा धाडसी निर्णय! सुरू केलं 'एलजीबीटी’ सेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी राष्ट्रवादीच्या एलजीबीटी सेलच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

राष्ट्रवादीचा धाडसी निर्णय! सुरू केलं 'एलजीबीटी’ सेल
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत धाडसी निर्णय घेत पक्षांतर्गत ‘एलजीबीटी’ (गे, लेस्बियन, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर) सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एलजीबीटी समूहाला सामाजिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या सेलची स्थापना करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. राष्ट्रवादीने घेतलेला हा पुढाकार इतर पक्षांसाठी देखील मार्गदर्शक ठरू शकेल. (sharad pawar led ncp starts lgbt cell in maharashtra) शिवाय असं सेल करणारा राष्ट्रवादी केवळ महाराष्ट्रातीलच नाही, देशातील पहिला मोठा राजकीय पक्ष ठरलाआहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सोमवार ५ आॅक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादीच्या एलजीबीटी सेलच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे समलिंगी समाजातील व्यक्तींनाही राजकारणात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

हेही वाचा- मला वाटतं ‘ते’ रात्री कपडे घालून तयारच असतात - शरद पवार

जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विविध सेलमध्ये एल.जी.बी.टी. हा नवीन सेल सुरू करण्याचं ठरवण्यात आलं आहे. एल. जी. बी. टी. समुदायला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा नवीन सेल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सेलच्या माध्यमातून समलैंगिक समूहाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा उद्देश आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी समलैंगिक समूहाच्या प्रश्नांसाठी वेल्फेअर बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता, त्याबाबतही आगामी काळात पुढाकार घेणार असल्याची माहिती यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

तर, महाराष्ट्रात एल.जी.बी.टी समूह १०-१२% आहे. त्यांच्या प्रश्नांची दखल समाजाकडून घेतली जात नाही, मात्र या सेलच्या माध्यमातून आम्ही त्यांची दखल घेऊ, समानता, रोजगाराबाबत पुढाकार घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस एलजीबीटी सेलच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया पाटील यांनी व्यक्त केला.

या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर कार्यकर्त्यांच्या बरोबरीने आता समलैंगिक पदाधिकारी, कार्यकर्ते देखील ठोस राजकीय भूमिका घेताना दिसणार आहे. 

हेही वाचा- खड्ड्यांनी जीव मेटाकुटीला आणलाय, राष्ट्रवादी ‘सेल्फी विथ खड्डा’ का काढत नाही?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा