Advertisement

मला वाटतं ‘ते’ रात्री कपडे घालून तयारच असतात - शरद पवार

मला वाटतं ‘ते’ रात्री कपडे घालून तयारच असतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता लगावला.

मला वाटतं ‘ते’ रात्री कपडे घालून तयारच असतात - शरद पवार
SHARES

राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं भाकीत नुकतंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलं होतं. त्यावर मला वाटतं ‘ते’ रात्री कपडे घालून तयारच असतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता लगावला. (ncp chief sharad pawar slams bjp leader chandrakant patil over his midterm election in maharashtra comments)

प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात मध्यावधी निवडणुकांचं भाकीत करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, कारण आता फक्त ६ महिने गेले आहेत. आणखीन साडेचार वर्षे त्यांना वाट बघायची आहे, असं सांगत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार स्थिर असून ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे संकेत देखील शरद पवार यांनी दिले.

त्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंपाचा दावा चंद्रकात पाटील करत असले, तरी असले भूकंप आता तरी होणार नाहीत. त्यासाठी त्यांनी गजर वैगेरे लावला असेल तर मला माहिती नाही. पुढची ५ वर्षे काही काम नसल्याने आमच्या भेटीने भाजपा नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या असतील, असं संजय राऊत म्हणाले होते.

हेही वाचा - राज्यात मध्यावधी निवडणूक? संजय राऊत म्हणाले…

काही दिवसांपूर्वी मुंबईतील हयात हाॅटेलमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. ही भेट सामना दैनिकासाठी मुलाखत ठरवण्याकरीता झाल्याचं स्पष्टीकरण दोघांनीही देऊनही या भेटीवर चर्चा सुरूच होती.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं असता, जेव्हा दोन वेगळ्या पक्षातील वरच्या पातळीवरील नेते एकमेकांना भेटतात, तेव्हा त्यांच्यात राजकीय चर्चा ही होतेच. ते एकमेकांसोबत दोन ते अडीच तास असतील, तर ते नक्कीच चहा-बिस्कीटावर चर्चा करणार नाहीत. राज्यात मध्यावधी निवडणुकांचा भूकंप कधीही होऊ शकताे. कोरोनामुळं सध्या संकटाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कुणालाही निवडणुका नको आहेत. मध्यावधी निवडणुका होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील; पण शेवटी कोणाचीच समीकरणं जुळली नाहीत, तर अन्य पर्यायही समोर येऊ शकतो, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी वेगळ्या राजकीय समीकरणाची शक्यताही यावेळी बोलून दाखवली. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा