टोकाची पेक्षा टोकदार भूमिका घ्या - शेलार

 Mumbai
टोकाची पेक्षा टोकदार भूमिका घ्या - शेलार

मुंबई - टोकाची भूमिका घेण्यापेक्षा टोकदार भूमिका घ्या असं म्हणत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. महाराष्‍ट्रातील काही लोक अजूनही संभ्रमावस्‍थेत तसेच वैचारिक गोंधळात अडकले आहेत, सतत दुतोंडी भूमिका घेत राहतात आणि अशी दुतोंडी भूमिका काही घराण्यांना शोभत नसल्याचं सांगत शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं. राज्य सरकारची दोन वर्षांची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र भाजपचा सुराज्यपर्व कार्यक्रमांतर्गत ठाण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. तसेच महाराष्ट्रात सत्तेत सोबत राहून काहींना मनमोहनसिंग आदर्श वाटतात त्यामुळे त्यांच्या दुतोंडी भूमिकेमुळे जनता पक्षाबाबत संभ्रमात असल्याचही ते म्हणालेत. कधी नोट बंदीच स्वागत करतात तर कधी विरोध त्यामुळे टोकदार भूमिका घ्या असा टोला शेलारांनी उद्धव ठाकरेंना हाणला.

Loading Comments