Advertisement

शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करणार? पालिकेकडून निर्णय होल्डवर

दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज देतोय. पण तो अर्ज कुणी स्वीकारत नसल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप

शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करणार? पालिकेकडून निर्णय होल्डवर
SHARES

शिवसनेची जांभुरी मैदान इथली दहीहंडी हायजॅक केल्यानंतर आता शिंदे गट (Eknath Shinde) आणि भाजपाचे (BJP) पुढचे लक्ष्य दादरच्या शिवाजी पार्कमधील दसरा मेळावा असणार आहे. शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara) हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.  

शिवाजी पार्क (Shivaji Park) इथं दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने महापालिकेकडे (BMC) दोनचा अर्ज देखील केला आहे. पण दसरा मेळाव्याबाबतचा निर्णय महापालिकेकडून होल्डवर ठेवण्यात आला आहे. गणेशोत्वानंतरच याबाबत निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण महापालिका सहाय्यक आयुक्त सपकाळे यांनी दिले आहे.

सध्या सर्व स्टाफ गणेशोत्सवाकरता आवश्यक प्रशासनिक बाबी आणि तयारीत गुंतल्यामुळे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मुंबई महापालिकेत बदल्यांचं सरकार झालं आहे. त्यांनी परवानगी दिलेली नाही. आतापर्यंत शिवतीर्थावर दसरा मेळावा होत आला आहे. दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार, जनता देखील हे बघत आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज देतोय. पण तो अर्ज कुणी स्वीकारत नाही. हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे. ओरिजनल शिवसेना कुणाची हे तुम्हाला माहित आहे. जनता आमच्या सोबत आहे आणि सोबत राहणार. किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर बद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,  किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावर मी काही बोलत नाही.

शिवसेना आणि दसरा मेळावा हे अतूट नातं आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या परंपरेची सुरुवात केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवर्षी दसरा मेळाव्यात संबोधित करत असतात.

यंदा 5 ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा असेल. या निमित्ताने दादरच्या (Dadar) शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात.



हेही वाचा

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा

मनसे प्रमुख राज ठाकरेंना पाेलिसांनी बजावली नाेटीस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा