एक नंबर प्रभागात चाललंय काय?

 Dahisar
एक नंबर प्रभागात चाललंय काय?

दहिसर - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम आणि मुंबईच्या महिला काँग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे यांच्यातील दरी आता वाढत चालली आहे. मर्जीतल्या लोकांना आणि नातेवाईकांना तिकीट वाटप करून महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केल्याने निरूपम विरूद्ध म्हात्रे असा वाद रंगला होता. मात्र आता तो अधिकच चिघळला आहे.

शीतल म्हात्रे वॉर्ड नं 1 मधून निवडणूक लढवत आहेत. एकीकडी इतर उमेदवार आपल्या नेत्यांना प्रचारासाठी आणत आहेत तर दुसरीकडे शीतल म्हात्रे यांनी माजी खासदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांना प्रचारसाठी बोलावलेच नाही. याबाबत शीतल म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला तर दुसरीकडे आपल्याला प्रचारासाठी बोलावण्यात आलेले नाही, बोलवले तर प्रचार करण्यासाठी जाईन अशी प्रतिक्रिया संजय निरूपम यांनी दिली.

Loading Comments