Advertisement

दादर-माहिमच्या स्थानिक शिवसैनिकांनी सदा सरवणकरांच्या फोटोला फासलं काळं

शिवसेना आमदार सदा सरवणकर हे देखील एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झाले आहेत.

दादर-माहिमच्या स्थानिक शिवसैनिकांनी सदा सरवणकरांच्या फोटोला फासलं काळं
SHARES

शिवसेना आमदार सदा सरवणकर हे देखील एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झाले आहेत. यासाठी बुधवारी सदा सरवणकर गुवाहाटिला रवाना झाले. सध्या ते इतर आमदारांसोबतच गुवाहाटिमध्ये आहेत. पण सदा सरवणकर यांच्या बंडखोरीनंतर दादर-माहिम इथले स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

आमदार सदा सरवणकर यांच्या फोटोला स्थानिक शिवसैनिकांनी काळे फासले आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांनी उचललेल्या या पावलामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे, असं स्पष्ट दिसून येत आहे. सदा सरवणकर हे माहीम दादर विधानसभेचे आमदार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर सदा सरवणकर यांनी खुद्द नाराजी व्यक्त केली होती. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी सदा सरवणकर हे देखील शिवसेना भवनाबाहेर हजर होते. त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. मी त्यांच्यासोबत आहे आणि कायम राहणार. पण बुधवारी रात्री ते अचानक खुवाहाटीसाठी रवाना झाले.

दरम्यान शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या वाढतच आहे. रामटेकचे शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह चार आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

आज आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार आज शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. एकनाथ शिंदे आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

बुधवारी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरांना प्रत्यक्षात चर्चा करण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातली. त्यानंतरही शिवसेनेतील आमदारांची गळती कमी होताना दिसत नाही.

आज एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झालेले आमदार हे मागील दोन दिवस शिवसेनेच्या बैठकीत सहभागी होते. त्यानंतर आज हे आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले. आमदार सदा सरवणकर यांच्यासोबत त्यांची कन्यादेखील गुवाहाटीत दाखल झाली आहे. आज दाखल झालेल्या शिवसेना आमदारांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.



हेही वाचा

एकनाथ शिंदेंना भाजपाकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफिर?

'ज्यांना जायचं आहे त्यांनी जा…' वर्षा'वरून निघताना उद्धव ठाकरे भावूक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा