Advertisement

'ज्यांना जायचं आहे त्यांनी जा…' वर्षा'वरून निघताना उद्धव ठाकरे भावूक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर वर्षा बंगला सोडला आहे.

'ज्यांना जायचं आहे त्यांनी जा…' वर्षा'वरून निघताना उद्धव ठाकरे भावूक
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर वर्षा बंगला सोडला आहे. आता ते मातोश्रीतच राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये वर्षा बंगला सोडत असून पुन्हा मातोश्रीवरच रहायला जाणार, असं म्हटलं होतं. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवावसस्थान सोडलं आहे.

ज्यांना जायचं आहे त्यांनी जा... असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 'वर्षा'वरून 'मातोश्री'कडे जाताना उद्धव ठाकरे असं बोलले आणि निघून गेले. उद्धव ठाकरे यावेळी भावूक झाल्याचं दिसून आलं.

मुख्यमंत्री वर्षा बंगला सोडताना शिवसैनिकांनी गर्दी केली होती. अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर आले होते. त्यावेळी शिवसैनिकांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपली बाजू फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मांडली. तसेच शिंदेसह भाजपला चोख उत्तर देखील दिलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे फेसबूक लाईव्हमधून (Facebook Live) म्हणाले, तुम्हाला जे वाटतं ते एकदा समोर येऊन बोला. जर तुम्हाला मी पदावर नको असेन तर तसं सांगा. मी हे पदही सोडायला तयार आहे. मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.



हेही वाचा

"अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक", उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी फेटाळला

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संवादातील ५ महत्त्वाचे मुद्दे, जाणून घ्या

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा