Advertisement

"अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक", उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी फेटाळला

महाविकास आघाडीसोबतच्या युतीवर त्यांची नाराजी असल्याचं ट्विटमधून समोर येत आहे.

"अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक", उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी फेटाळला
SHARES

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हनंतर एकनाथ शिंदे यांनी हे ट्विट केलं आहे. यावरूनच महाविकास आघाडीसोबतच्या युतीवर त्यांची नाराजी असल्याचं ट्विटमधून समोर येत आहे. 

एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये चार मुद्दे मांडले आहेत. यासोबतच त्यांनी #HindutvaForever असा हॅशटॅगही वापरला आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडण्याची आवश्यक्ता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच गेल्या अडीच वर्षात महाविकासआघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिकांना नाही. यामुळे शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदेंनी ट्विटमध्ये मांडले हे मुद्दे

१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला.

२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.  

३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.

४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत एकनाथ शिंदे यांना प्रस्ताव दिला होता. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना आपल्या शैलीत सुनावले होते. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आघाडीतून बाहेर पडणे का गरेजचं आहे? हे ट्विटमधून एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेय.

एकप्रकारे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव धुडकावत परत येणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेय.

दरम्यान, शिवसेनेमध्ये (Shivsena) बंड झाल्यानंतर आता पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे. मंगळवारी शिवसेनेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं गटनेतेपद काढून घेतलं, यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना नोटीस पाठवली आहे.

शिंदे यांनी त्यानंतर झिरवाळ यांना नवं पत्र पाठवत सुनील प्रभू यांच्या नियुक्तील आव्हान दिलंय. सुनील प्रभू यांचा आदेश अवैध असून प्रतोदपदी भारत गोगावली यांची नियुक्ती केल्याचं शिंदे यांनी जाहीर केले आहे. शिंदे यांच्या या नव्य भूमिकेमुळे शिवसेनेतील ठाकरे विरूद्ध शिंदे संघर्ष तीव्र झाला आहे.



हेही वाचा

maharashtra"="" target="_blank">Maharashtra Political crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संवादातील ५ महत्त्वाचे मुद्दे, जाणून घ्या">Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संवादातील ५ महत्त्वाचे मुद्दे, जाणून घ्या

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा