Advertisement

एकनाथ शिंदेंना भाजपाकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने एकनाथ शिंदे यांना बंडखोर आमदारांसह भाजपचे सरकार बनवल्यास त्यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.

एकनाथ शिंदेंना भाजपाकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर?
SHARES

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. भाजपच्या प्रस्तावावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वेळ आल्यास बहुमत सिद्ध करु, असा दावा केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. शिवसेना आमदार आणि भाजपची याबाबत चर्चा सुरु आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मते, महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांची ग्रामीण भागातील ताकद झपाट्याने वाढत आहे. शिवसेनाचा विस्तार होत नाही.

शिवसेनेच्या नेत्यांची कामे होत नाहीत. अन् झाली तर त्याचं श्रेय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेतात, असा दावाही बंडखोर शिवसेना आमदारांनी केलाय. उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय येथे असणारे सर्व आमदार घेतील, फक्त एकनाथ शिंदे हा निर्णय घेऊ शकत नाहीत, अशी भूमिका तेथील आमदारांची असल्याचं सूत्रांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर बंडखोर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना आपल्या शैलीत सुनावले होते. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आघाडीतून बाहेर पडणे का गरेजचं आहे? हे ट्विटमधून एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेय. एकप्रकारे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांचा प्रस्थाव धुडकावत परत येणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेय.



हेही वाचा

दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर नॉटरिचेबल? अनेक चर्चांना उधाण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल, 'हे' आहे कारण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा