Advertisement

दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर नॉटरिचेबल? अनेक चर्चांना उधाण

सदा सरवणकर हे माहीम दादर विधानसभेचे आमदार आहेत.

दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर नॉटरिचेबल? अनेक चर्चांना उधाण
SHARES

शिवसेना आमदार सदा सरवणकर सुद्धा नॉट रिचेबल येत आहेत, अशी माहिती न्यूज १८ लोकमतनं दिली आहे. त्यासोबतच ते गुहावटीला निघाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. पण यासंदर्भात अद्याप कुठलीच अधिकृत माहिती मिळाली नाही. सदा सरवणकर हे माहीम दादर विधानसभेचे आमदार आहेत.

मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी सदा सरवणकर हे देखील शिवसेना भवनाबाहेर हजर होते. त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. मी त्यांच्यासोबत आहे आणि कायम राहणार. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना परत येण्याचं आवाहन केल्यानंतर ही शिवसेनेचे 4 आमदार शिंदे गटात पोहोचले आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसोबत गुवाहटीच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांच्या गटात आता आणखी 4 आमदार दाखल झाले आहेत. (More 4 Shivsena MLA Reached in Guvahati to join shinde group)

गुवाहटीला गेलेल्या आमदारांमध्ये गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील, योगेश कदम, मंजुळा गावित यांचा समावेश आहे. हे चारही आमदार हॉटेलमध्ये पोहोचताच त्यांचं इतर आमदारांनी स्वागत केलं. या आमदारांना एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतरही हे 4 आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत.

1 गुलाबराव पाटील - मंत्री महोदय - जळगाव ग्रामीण
2 योगेश कदम - आमदार - दापोली
3 चंद्रकांत दादा पाटील - मुक्ताई नगर
4 मंजुळा ताई गावित - साक्री - धुळे

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच मोठी फूट पडताना दिसत आहे. शिवसेनेचे आणखी काही आमदार शिंदे गटात सहभागी होतात का याबाबत आता उत्सूकता वाढत आहे. तर शिवसेनेचं टेन्शन वाढत आहे.



हेही वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल, 'हे' आहे कारण

'ज्यांना जायचं आहे त्यांनी जा…' वर्षा'वरून निघताना उद्धव ठाकरे भावूक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा