Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल, 'हे' आहे कारण

ऑनलाइन पद्धतीने मलबार हिल पोलिस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल, 'हे' आहे कारण
SHARES

भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचा भंग करत लोकांची भेट घेतली अशी तक्रार तेजिंदर पाल सिंह यांनी दिली आहे.

ऑनलाइन पद्धतीने मलबार हिल पोलिस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तेजिंदर पाल सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

ऑनलाईन तक्रारीत ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमाचं उल्लंघन केलेय आहे. बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांमध्ये उद्धव ठाकरे यांना कोरोना झाल्याचे वृत्त झळकले होते. याला काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दुजोरा दिला होता. कोरोना नियमांनुसार, कोरोना रुग्णाला कुणालाही भेटता येत नाही. विलगीरणात राहावे लागते. पण मुख्यमंत्री सर्वांना भेटत असल्याचे बातम्यांमध्ये दिसले. उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियम मोडले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करतो.

शिंदे यांच्या बंडानंतर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संबोधन केले. उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थान सोडण्यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांना भेट दिली. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

कोरोना झाला असताना देखील मुख्यमंत्री भेटीगाठी करत होते असा आरोप करत त्यांनी ही पोलिस तक्रार केली आहे.  



हेही वाचा

'ज्यांना जायचं आहे त्यांनी जा…' वर्षा'वरून निघताना उद्धव ठाकरे भावूक

"अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक", उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी फेटाळला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा