SHARE

मुंबई महापालिकेने पाण्याच्या दरात सुमारे 6 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीला शिवसेनेने कुठलाही आक्षेप न घेतल्याने या दरवाढीला शिवसेनेची मूक संमती असल्याचं स्पष्ट होत आहे. निवडणुकीपूर्वी मुंबईकरांवर कुठलीही दरवाढ लादणार नाही, असं आश्वासन देणाऱ्या शिवसेनेने मुंबईकरांना फसवल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या पाणीदरवाढीवर मुंबईभर आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


धमकी देण्यापेक्षा कामावरून काढा

नियमांनुसार परवाने रद्द करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याला महापौर विश्वनाथ महाडेश्वर जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ''तुम्ही परवाने रद्द केले, आता तुम्हाला निलंबित करतो'', असे बोलताना महाडेश्वरांचा आवाज ऑडिओ क्लिपमध्ये कैद झाला आहे. यावर संजय निरूपम यांनी जाब विचारण्यापेक्षा बेकायदा कामाला पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाका, असा महाडेश्वरांना सल्ला दिला.


काँग्रेस जीएसटीच्या विरोधात नाही

काँग्रेस पक्ष आणि मी जीएसटीच्या विरोधात नाही. काँग्रेस सत्तेवर असताना जीएसटी लागू करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोध केला होता. आता भाजपा जीएसटी लागू करत आहे. त्यामध्ये तीन टप्पे सुचवण्यात आले. त्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे सांगत निरुपम यांनी जीएसटीवरून अरूण जेटली आणि मोदींवर जोरदार टीका केली.


हे देखील वाचा - मुंबईत दरवर्षी पाण्याची दरवाढ अटळ!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)संबंधित विषय
ताज्या बातम्या