Advertisement

तर, शिवसेना शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारेल- उद्धव ठाकरे


तर, शिवसेना शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारेल- उद्धव ठाकरे
SHARES

विलेपार्ले पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भर उन्हात उभा आहे. शिवसेना हे कदापी सहन करणार नाही. जीव्हीके कंपनीला किंवा राज्य सरकारला या पुतळ्यावर छत्र उभारणं जमत नसेल, तर शिवसेना महाराजांच्या पुतळ्यावर रायगडाची प्रतिकृती असलेलं छत्र उभारेल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते शिवजयंतीनिमित्त विलेपार्ले इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

अरबी सुमुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच केली होती. तर या स्मारकाच्या कामाचं टेंडर एल अँड टी कंपनीला नुकतंच देण्यात आलं.

पण, विलेपार्ले (पूर्व ) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि अंधेरी (पूर्व) सहार वेअरहाऊस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा १२ महिने ऊन व पाऊस झेलत आहे. त्याच्या डोक्यावर छत्र बसवण्याची तसदीही सरकारने घेतलेली नाही, अशी खंत वॉचडॉग फाऊंडेशनचे विश्वस्त अॅड. ग्राडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी व्यक्त केली होती. त्यापार्श्वभूमीवर उद्धव यांनी राज्य सरकारवर टीका केली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा