Advertisement

उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात


उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात
SHARES

स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. प्रथमच होणाऱ्या या भेटीकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. 


हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी स्थानिकांसह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं समजत आहे. नाणार येथील प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिकांनी केलेल्या विरोधाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी ही भेट होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई असणार आहेत. नाणार प्रकल्प कोकणात आणण्यात शिवसेनेचाच पुढाकार होता, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. या प्रकल्पावरून दोन्ही पक्षात बऱ्याचदा खटके उडाले असल्याने आजच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा