Advertisement

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागो अभियान


राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागो अभियान
SHARES

धारावी - राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त धारावीतल्या 90 फूट रस्त्यावर शनिवारी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीनं जागो ग्राहक जागो अभियान राबवण्यात आलं. या वेळी स्थापत्य समिती अध्यक्ष, नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी, शिवसेना उपविभाग प्रमुख मुत्तू तेवर, प्रकाश आचरेकर, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे कक्षप्रमुख किरण काळे, गुजरात संपर्क प्रमुख कमलेश वारीया आदी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
अजूनही सर्वसामान्य ग्राहक आपला हक्क आणि कायद्याबाबत अनभिज्ञ आहे. परिणामी दुकानदार, व्यापारी, सरकारी आणि खासगी कंपन्या सर्वसामान्य ग्राहकांची उघड लूट करत आहेत. समोर एखादी घटना घडल्यास आपण काय करावे? कोणाकडे जावे? असा प्रश्न ग्राहकांना पडतो जर ही लयलूट थांबवायची असेल तर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाशी संपर्क करा असं आवाहन स्थापत्य समिती अध्यक्ष, नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांनी या वेळी केला. दरम्यान जागो ग्राहक जागो अभियानाची शेकडो पत्रके वाटण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा