हार्दिक पटेल-उद्धव ठाकरे भेटीला पाटीदार समाजाचा विरोध

 Mumbai
हार्दिक पटेल-उद्धव ठाकरे भेटीला पाटीदार समाजाचा विरोध
Mumbai  -  

मुंबई - पटेल समुदायाचे नेते हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र आता या भेटीचा निषेध पाटीदार अनामत आंदोलन समितीने केला आहे. 'मुंबई लाइव्ह'च्या हाती या समितीचे पत्र लागले असून, या पत्रात शिवसेनेला विरोध करण्यात आला आहे. शिवसेना मुंबईतील गुजराती समाजाच्या लोकांना पिटाळण्याचा प्रयत्न करत आहे. काही गुजराती नेते अशा लोकांच्या नादी लागले असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

कुणा एका गुजराती नेत्याला बोलावले तरी शिवसेनेचे गुजरातीबाबतचे धोरण बदलणार नसल्याचे देखील या पत्रात सांगण्यात आले आहे. जुमलेबाज पक्षांना साथ देऊन शिवसेनाही जुमलेबाज झाल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. पाटीदार अनामत आंदोलन समितीचे संयोजक चिराग पटेल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की 'हार्दिक पटेल अजून लहान आहे. शिवसेना त्यांच्या सोबत काय करत आहे हे ते ओळखू शकलेले नाहीत'. बुधवारी मुंबईत येऊन पाटीदार अनामत आंदोलन समितीतर्फे भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading Comments