प्रचारसभेत शिक्षणमंत्र्यांची शिवसेनेवर टीका

 Dahisar
प्रचारसभेत शिक्षणमंत्र्यांची शिवसेनेवर टीका

दहिसर - दहिसर पूर्व चौगुलेनगरमध्ये सोमवारी भाजपाची प्रचारसभा घेण्यात आली. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिवसेनेवर चांंगलीच आगपाखड केली. पालिका निवडणुकीत जनताच शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देईल. शिवसैनिक जे आहेत ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत की राष्ट्रवादीचे हाच प्रश्न पडतो. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर टीका करत त्यांनी केबल व्यवसाय काय आहे हे आम्हाला माहीत आहे. संजय घाडी हा इकडून तिकडे जाणारा माणूस आहे, अशी टीका विनोद तावडे यांनी प्रकाश सुर्वे आणि संजय घाडी यांच्यावर केली.

शिवसेना प्रमुख 'औकात' या शब्दाचा अर्थ चुकीचा घेतात. विदर्भात 'औकात'चा अर्थ म्हणजे आम्ही आमची ताकद दाखवू असा होतो. जवानांना जे अन्न पुरवलं जात ते पालिका पुरवते का असा सवाल ही विनोद तावडे यांनी या वेळी केला. महानगर पालिकेची जेवढी महत्त्वाची पदं आहेत ती सर्व शिवसेना घेते आणि आमच्यावर उगाचच आरोप करत बसते अशीही तोफ या वेळी शिक्षणमंत्र्यांनी शिवसेनेवर डागली. तसंच दहिसरकरांसाठी या भागात मैदान बांधू असं आश्वासनंही तावडेंनी यावेळी दिलं.

Loading Comments