Advertisement

आम्ही पहिल्यापासूनच जमीनीवर, शिवसेनेचं अमित शाहांना प्रत्युत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जागा दाखवण्याची भाषा केली होती. यावरून आता शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली आहे.

आम्ही पहिल्यापासूनच जमीनीवर, शिवसेनेचं अमित शाहांना प्रत्युत्तर
SHARES

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जागा दाखवण्याची भाषा केली होती. यावरून आता शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली आहे.  

"मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीसाठी शिवसेनेने (Siv Sena) प्रथम 150 चा नारा दिला आहे. अमित शाह हे केंद्रीय नेते आहेत, त्यांनी 150 चा नारा देणं म्हणजे आमची कॉपी आहे. शिवाय धोके कोण कोणाला देत आहे हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वजण पाहात आहेत. मुंबईकरांना तुमचे धोके आणि खोके देखील नको आहेत. शिवाय आम्ही पहिल्यापासूनच जमीनीवर आहोत, आम्हाला काय जमीन दाखवणार, तुम्ही आस्मानात आहात ते आम्ही तुम्हाल जमीनीवर आणू, लवकरच भाजपला त्यांची जागा दाखवू असा इशारा शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्या टिकेला उत्तर देताना दिला आहे.

"राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे” अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला होता.

शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी देखील अमित शाह यांच्या या टिकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

"उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये झालेल्या मिटींगला मी शिवसेना नेता म्हणून हजर होतो. त्यावेळी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घेण्यावर चर्चा झाली होती. एवढं होऊन जर अमित शाह हे उद्धव ठाकरे यांना धोक दिला असं म्हणत असतील तर ती भयानक चीड येणारी गोष्ट आहे. या गोष्टी आम्ही सहन करणार नाही. ते ठाकरे आहेत, ते यांच्यासारखे इकडून तिकडे पलटणारे नाहीत. संपूर्ण देश म्हणत आहे आता भाजपला जमीन दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आम्हीच यांना जमीन दाखवू, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपला दिला आहे.



हेही वाचा

वेळ आली आहे उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे : अमित शाह

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा