Advertisement

आमच्या टेकूवर सरकार उभं- संजय राऊत

विद्यमान सरकारसोबत शिवसेना सत्ताधारी नसून अाम्ही फक्त त्यांना टेकू दिला अाहे. राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी शिवसेना सत्तेत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला अाहे. डोंबिवलीत एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी विधान केल्यानंतर अाता राजकीय घडामोडींना वेग येणार अाहे.

आमच्या टेकूवर सरकार उभं- संजय राऊत
SHARES

भाजपानं स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याची हाक दिल्यानंतर अाता भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचे प्रयत्न होत अाहेत. मात्र अाता भाजपनं अामचा मुका जरी घेतली तरी अाता युती होणे शक्य नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं अाहे. विद्यमान सरकारसोबत शिवसेना सत्ताधारी नसून अाम्ही फक्त त्यांना टेकू दिला अाहे. राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी शिवसेना सत्तेत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला अाहे. डोंबिवलीत एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी विधान केल्यानंतर अाता राजकीय घडामोडींना वेग येणार अाहे.


शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर

शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपकडून सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न केले. त्यावर खरमरीत प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आलं. भाजपच्या सध्याच्या कारभारावर संजय राऊत यांनी ताशेरे अोढले. सध्या बलात्कार, जातीयद्वेष यामुळे देशात आणि राज्यातील वातावरण हे एकंदरीत भ्रमनिरास करणारं अाहे.


राज्यसभा उपसभापतीपदाची अाॅफर नाकारली

शिवसेनेला सोबत घेण्यासाठी भाजपनं संजय राऊत यांची राज्यसभाच्या उपसभापतीपदी नियुक्ती करण्याची अाॅफर दिली होती. मात्र शिवसेनेनं ही अाॅफर धुडकावून लावली अाहे. पक्षाचा स्वाभिमान दुखावला जाईल, अशी कोणतीही पदं अापण स्वीकारणार नाहीत, असं सांगत संजय राऊत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला अाहे.


हेही वाचा -

शिवसेनेला उपसभापतीपदाचं आमिष, संजय राऊतांच्या नावाची चर्चा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा