Advertisement

तर आम्ही भाजपला पाठिंबा देऊ- संजय राऊत

आम्ही सरकार स्थापन करताना देखील सांगितलं होतं की आम्हाला बहुमताची नाही, तर कोरोनाच्या संसर्गाची चिंता आहे, असं संजय राऊत म्हणाले.

तर आम्ही भाजपला पाठिंबा देऊ- संजय राऊत
SHARES

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असताना केंद्र आणि राज्यातील नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळात, “पेट्रोल-डिझेल दरवाढीवर राज्यातील विरोधी पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन करावं, आम्ही त्यांना नक्कीच पाठिंबा देऊ”, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपला टोला लगावला आहे.

राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर मागील १० दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलचे दर तर आता १०० रुपये प्रति लिटरच्या जवळपास जाऊन पोहोचले आहेत. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती देखील ८०० रुपयांवर गेल्या आहेत. या वाढत्या किंमतीची झळ सर्वसामान्यांना बसत असताना केंद्र आणि राज्य सरकारमध्ये केवळ आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु कुणाकडूनही सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असा निर्णय घेण्यात पुढाकार होताना दिसत नाही. त्यातच इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर शिवसेनेने (shiv sena) राज्यव्यापी आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. त्याची भाजप नेत्यांकडून टिंगल उडवली जात आहे.

हेही वाचा- “कल करे सो आज कर”, कार्यालयीन वेळेबाबत पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी

त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भलेही इंधन दरवाढीविरोधातील आंदोलनाची थट्टा करत असतील, तरी देखील हा सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न आहे. भाजपने (bjp) देशभरात आणि राज्यात लोकांच्या कल्याणाची भावना लक्षात घेत इंधन दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरावं. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.

संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. कोरोनाचे कारण सांगत राज्य सरकार अधिवेशन लांबवण्याचा प्रयत्न करत असून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना सरकार घाबरत आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला होता.

त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, कोरोनाचं (coronavirus) कारण पुढं करून संसद होऊ दिली नाही. हे चंद्रकांत दादा विसरले का? हे देशावर नव्हे तर जगावर आलेलं संकट आहे. ५ वर्षे सत्तेत राहिलेल्या चंद्रकांतदादांसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचं भाष्य करावं हे दुर्देव आहे. आम्ही घाबरण्याचं काहीच कारण नसून आमच्याकडे आजही १७० चं बहुमत आहे. आम्ही सरकार स्थापन करताना देखील सांगितलं होतं की आम्हाला बहुमताची नाही, तर कोरोनाच्या संसर्गाची चिंता आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

(shiv sena mp sanjay raut challenges maharashtra bjp president chandrakant patil to do a protest against fuel price hike)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा