Advertisement

बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांना टोला

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

बाप बदलण्याची भाषा कोण करतंय? संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांना टोला
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ आहे. संजय राऊतांनी ट्वीट करत म्हटलंय की, बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा. श्रीमान केसरकर, थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

व्हिडीओत गुलाबराव पाटील म्हणत आहेत की, शिवसेनेत पुंगी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. शिवसेनेत रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले. पानटपरी चालवणारे गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय. हे सोडा सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. 'कतलिया कही साप बदल लेते है, पुण्य की आड में पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है', असं गुलाबराव पाटील या व्हिडीओत म्हणत आहेत.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी दहिसरमधील सभेत बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला होता.

संजय राऊत म्हणाले की, मी प्रताप सरनाईकांना फोन केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टात केस आहे म्हणून आलो आहे. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मला फोन करुन सांगितलं की, 'देवेंद्र फडवणीस मला भेटले इथं. ते मला अमित शाहांकडे घेऊन गेले आणि माझं ईडीचं मॅटर क्लियर साफ झालं. त्यामुळं मी आता सूरतला जात आहे, असं सरनाईकांनी मला सांगितलं.

राऊत पुढे म्हणाले, अशी कोणती वॉशिंग मशीन होती की इतकी मोठी हजारो कोटींची भ्रष्टाचाराची केस अशी टाकली आणि स्वच्छ झाली.', अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नीवर देखील किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मात्र ते दोघेही दिल्लीला गेले आणि त्यांनाही वॉशिंग मशीनमध्ये टाकलं आणि ते स्वच्छ झाले. ते सूरतवरुन थेट गुवाहाटीला गेले. काय वॉशिंग मशीन आहे. हा कोणता ब्रँड आहे.



हेही वाचा

संजय राऊतांचा आरोप, 'प्रताप सरनाईकांनी सांगितलं फडवणीस मला अमित शाहांकडे घेऊन गेले अन् माझं ईडीचं मॅटर साफ झालं',

maharashtra"="" target="_blank">Maharashtra political crisis: एकनाथ शिंदे गट मनसेच्या इंजिनला जुडणार?">Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे गट मनसेच्या इंजिनला जुडणार?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा