Advertisement

Maharashtra political crisis: एकनाथ शिंदे गट मनसेच्या इंजिनला जुडणार?

अपात्रतेच्या कारवाईविरोधात न्यायालयात जाण्यापासून वाचण्यासाठी हा एक पर्याय असल्याची चर्चा आहे.

Maharashtra political crisis: एकनाथ शिंदे गट मनसेच्या इंजिनला जुडणार?
SHARES

शिवसेनेतून बंड करून पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. 

त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला शिवसेना बंडखोरांच्या गटाला मान्यता न मिळाल्यास दुसरा पर्याय ही एकनाथ शिंदे गटाकडून पाहिला जात आहे. कायदे तज्ञांच्यामते शिंदे यांच्या सोबत दोन तृतीयांश गट सोबत असला तरी त्यांना हा गट दुसऱ्या पक्षात विलीन करावा लागणार आहे. त्यामुळे शिंदे गटासमोर भाजप आणि प्रहार असे दोन पर्याय होते. पण आता शिंदे गटासाठी नवा पर्याय उपलब्ध झाल्याची चर्चा आहे. 

नवीन चर्चेनुसार शिंदे गटाकडे मनसेचा देखील पर्याय उपलब्ध आहे. याबाबत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. सध्या मनसेचा विधानसभेत एकच आमदार आहे. 

शिवसेनेशी काडीमोड करत राज ठाकरे यांनी स्वत:चा मनसे पक्ष स्थापन केला. सुरुवातीला मराठीची कास धरत त्यांनी पक्षाचं इंजिन पुढे नेलं. पण विधानसभा निवडणुकीत पाहिजे तसं यश न मिळाल्याने त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्याचं देखील बोललं गेलं. 

तसंच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी वारंवार सागितलं आहे की, ते हिंदुत्वासाठी वेगळे होत आहेत. त्यांचं हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली आहे, ती बाळासाहेब ठाकरेंच्या पद्धतीची आहे असा दावा मनसेकडून केला जातो. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट मनसेत विलीन होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मनसेचे काही नेते आणि शिंदे गटातील काही प्रमुख आमदारांची याविषयी चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिंदे गट मनसेत विलिन होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा