Advertisement

परिचारकांचं निलंबन कायम ठेवा, शिवसेनेची मागणी

परिचारक यांचं निलंबन मागे घेण्याच्या निर्णयावर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नाराजी दर्शवत भाजपाचा खरपूस समाचार घेतला. मोदी विरूद्ध बोलणाऱ्यांचं निलंब करता आणि जवानांविरूद्ध बोलणाऱ्या परिचारकांचं निलंबन मागे घेता असं कसं? असा प्रश्न उपस्थित केला.

परिचारकांचं निलंबन कायम ठेवा, शिवसेनेची मागणी
SHARES

गेल्या वर्षी सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी विधान परिषदेतील सदस्य प्रशांत परिचारक याचं निलंबन करण्यात आलं होते. हे निलंबन मागे घेत असल्याचे घोषणा बुधवारी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबांळकर यांनी केली. पण या निर्णयाला शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. गुरूवारी शिवसेना प्रतोत अॅड. अनिल परब यांनी परिचारकाचं निलंबन मागे घेऊ नये, अशी मागणी विधानपरिषदेत केली.


नेमकं काय झालं?

सोलापूरमधील भाजपा पुरस्कृत आमदार परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांचं दीड वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. तसंच चौकशीसाठी उच्च स्तरीय समितीही गठीत करण्यात आली होती. या समितीचा अहवाल बुधवारी विधानपरिषेदेत सादर करण्यात आला. या समितीनं परिचारक याचं निलंबन मागे घेण्याची शिफारस केल्याची माहिती सभागृह नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी सभागृहाला दिली. त्यानुसार सभापतींनी आवाजी मदतदान घेत परिचारकांचं निलंबन मागे घेतल्याचं जाहीर केलं.


मग, मोदींविरोधात बोलणाऱ्यांचं निलंबन का?

या निर्णयावर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नाराजी दर्शवत भाजपाचा खरपूस समाचार घेतला. मोदी विरूद्ध बोलणाऱ्यांचं निलंब करता आणि जवानांविरूद्ध बोलणाऱ्या परिचारकांचं निलंबन मागे घेता असं कसं? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर गुरूवारी शिवसेनेकडून निलंबन कायम ठेवण्याची मागणी विधानपरिषदेत करण्यात आली. या मागणीनुसार विधानपरिषद सभापतींनी सदनाच्या सदस्यांनी निलंबन कायम ठेवण्यासाठी सूचना द्याव्यात, त्यावर ठराव मांडावा, असा सूचना केल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा