• हळदी कुंकू समारंभ
  • हळदी कुंकू समारंभ
SHARE

लक्ष्मणनगर - मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गोरेगावच्या लक्ष्मणनगरमध्ये शिवसेना शाखा क्रमांक 51 ते 54 विभागातर्फे आयोजित शाब्बास वहिनी महिला मेळावा आणि हळदी कुंकू समारंभ मंगळवारी रात्री लक्ष्मण नगरच्या मैदानात झाला. या सोहळ्याला आदेश बांदेकर प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. तसंच शिवसेना शाखाप्रमुख अजित भोगले, शाखा संघटक जयश्री चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी महापौर सुनील प्रभु यांच्या पत्नी सायली प्रभु देखील उपस्थित होत्या. विभागातील 1000हुन अधिक महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या