SHARE

चारकोप - आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चारकोप विधानसभेत तयारी सुरु झाली आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी संध्याकाळी शिवसेना शाखा, उपशाखाप्रमुख, युवा सेना आणि ग्राहक संरक्षण कक्षाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या विभागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना करण्यात आल्या . उपस्थितांना शाखाप्रमुख राजन निकम यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत शिवसेना शाखा क्रमांक 19 जुना आणि नवीन 20 च्या सर्व महिला पुरुष उपशाखाप्रमूख, गटप्रमुख, युवा सेना ग्राहक संरक्षण कक्ष पदाधिकारी यांची मिटिंग आयोजित करण्यात आली. या बैठकीत विभागाचे उपविभाग प्रमुख वसंत गुडुलकर, उपविभाग संघटक आकांक्षा नागम, महिला समन्वयक मणाली चौकीदार, युवा सेना विभाग अधिकारी अभिषेक शिर्के, रवींद्र देवधरे, सुनील राणे, रूपाली जाधव, पदाधिकारी आणि बैठक आयोजक शाखाप्रमुख राजन निकम, महिला शाखा संघटक प्रतिभा वाडेकर आदी उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या