Advertisement

भाजपकडून मला खोटं पाडण्याचा प्रयत्न झाला - उद्धव ठाकरे

आघाडीसोबत सरकार स्थापण्यास चंद्रकात पाटील यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचा आदर करायला हवा. राजकारण नव्या दिशेने जात असेल तर त्याची सुरूवात करायला हवी

भाजपकडून मला खोटं पाडण्याचा प्रयत्न झाला - उद्धव ठाकरे
SHARES
भाजपने खोटं बोलून मला खोटं पाडण्याचा प्रकार केला तो संतापजनक होता. आघाडीसोबत सरकार स्थापण्यास चंद्रकात पाटील यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचा आदर करायला हवा. राजकारण नव्या दिशेने जात असेल तर त्याची सुरूवात करायला हवी,  अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर टीका केली. 

मी स्वत:हून भाजपचा ऑप्शन संपवलेला नाही. त्यांच्याकडून देखील संपर्क सुरु आहे, असंही यावेळी उद्धव म्हणाले.  भाजपकडून मला दररोज संपर्क केला जात आहे. पण जर प्रत्येक संपर्कामध्ये नवनवीन गोष्टी ठरवल्या जात असतील तर त्या संपर्काला काहीही अर्थ नाही. आता राज्यपालांमुळे आपल्याकडे विचार करण्यास देखील भरपूर वेळ आहे, असंही उद्धव यावेळी म्हणाले. 

उद्धव म्हणाले की, आताच मी समोर येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद पाहिली. त्यात अहमद भाई म्हणाले की, त्यांना आमच्याकडू काही गोष्टींवर स्पष्टीकरण हवं आहे. तसंच मला देखील काही मुद्द्यांवर त्यांच्याकडून स्पष्टीकरण हवं आहे. किमान समान कार्यक्रम ठरवून पुढे जाऊ. ४८ तासांची आम्ही राज्यपालांकडे मागितली होती. मात्र, ती वेळ देण्यास नकार दिला. ६ महिन्यांची वेळ देतो असं राज्यपालांनी सांगितलं. ६ महिन्यांची मुदत आमच्यासाठी खूप आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा