• ग्राहक जागृती अभियान
SHARE

वडाळा - राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांना जागरूक करणाऱ्या पत्रकांचं प्रकाशन करण्यात आलं. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीनं शिला कुचिक यांनी शनिवारी या कार्यक्रमाचं आयोजन केलं.

या कार्यक्रमात ग्राहकांना जागरूक करणाऱ्या पत्रकांचं प्रकाशन शिवसेना विभाग प्रमुख मंगेश सातमकर यांच्यासोबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेश कुचिक यांच्या हस्ते कोरबा मिठागर, गणेशनगर येथील शाखा क्रमांक 180 आणि 181 येथे करण्यात आलं. या वेळी सायन विधानसभेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या