Advertisement

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार : संजय राऊत

संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार : संजय राऊत
SHARES

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन राऊत यांनी केले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, बाहेर असलेल्या शिवसेना आमदारांना जर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा असे वाटत असेल तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी 24 तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले, पत्रकारांना आणि इतरांना व्हॉट्सअॅपवर हॉटेलमधील फोटो, व्हिडिओ पाठवण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन चर्चा करावी. आमचा गुवाहाटीमधील 21 आमदारांसोबत संपर्क झाला असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली.

राऊत यांनी म्हटले की, राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे 20-25 आमदार पुन्हा शिवसेनेत येतील असा विश्वास आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी इच्छा असेल तर तुम्ही प्रत्यक्षात भेटून चर्चा करावी. मात्र, त्यांचा हा बहाणा असल्याचे राऊत यांनी म्हटले.



हेही वाचा

'ही आहे आमदारांची भावना', एकनाथ शिंदेंचं नव्या पत्रासह नवं ट्वीट

दादर-माहिमच्या स्थानिक शिवसैनिकांनी सदा सरवणकरांच्या फोटोला फासलं काळं

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा