गोरेगावात सेना-भाजपमध्ये चुरस

  Goregaon
  गोरेगावात सेना-भाजपमध्ये चुरस
  मुंबई  -  

  गोरेगाव - मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग फेररचनेमध्ये पी दक्षिण विभागात एक वॉर्ड वाढला आहे. त्यामुळे या प्रभागात आता आठऐवजी नऊ नगरसेवक निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेचा पारंपरिक मतदार आणि भाजपचा आमदार अशी परिस्थिती असल्याने या विभागात शिवसेना आणि भाजपामध्ये चुरस रंगणार आहे.

  गोरेगावच्या वाढीव प्रभागामुळे जितेंद्र वळवी यांना त्याचा फटका बसणार आहे. मात्र या प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व असल्यामुळे शिवसेनावर त्याचा परिणाम होणार नाही, असे चित्र दिसत आहे.
  शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंचा प्रभाग हा मागासवर्ग महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्याचा त्यांना फटका बसला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे समीर देसाईही खुल्या प्रभागातून भाजपासाठी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. दुसऱ्या बाजूला गोरेगावच्या मंत्री विद्या ठाकुर आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. या नऊ प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र आता भाजपाने आपले उमेदवार तयार करण्यासाठी कंबर कसली आहे.
  प्रभाग पुर्नरचनेविषयी जितेंद्र वळवी यांना विचारले असता "माझा प्रभाग अनुसूजित जातींसाठी आरक्षित झाला आहे. मी अनुसुचित जमातीचा आहे. त्यामुळे माझी पत्नी निवडणुक लढवू शकणार नाही. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.