'भाजपाचं व्हिजन भाजपकडेच राहू द्या'

  Dadar
  'भाजपाचं व्हिजन भाजपकडेच राहू द्या'
  मुंबई  -  

  माटुंगा - भाजपाचं व्हिजन भाजपाकडेच राहू द्या अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. तसंच शिवसेनेनं एकला चलो रे असा नारा देत मुख्यमंत्र्यांनी नागपूरात केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. सत्तेसाठी आम्ही नाही, तर आमच्यासाठी सत्ता असं वक्तव्यही या वेळी उद्धव ठाकरे यांनी केलं. शनिवारी रुईया महाविद्यालयात सच्चाई या पुस्तकांचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची व्हिजन मान्य असेल, तर युती करू असं वक्तव्य नागपूर मध्ये केले होते. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजपाचं व्हिजन भाजपाकडे राहू द्या अशी टीका केली. या सोहळ्याला ज्येष्ठ भाजपा नेते खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते . व्यासपीठावर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी देखील भाषणबाजी केली. विकासाच्या नाही तर हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपा पुढील निवडणूक जिंकू शकेल. हिंदू एकजूट झाले, तर संपूर्ण देशावर हिंदूराज असेल असं वक्तव्य त्यांनी या वेळी केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.