Advertisement

कामगारांच्या देशव्यापी संपात शिवसेना सहभागी, करणार मोदी सरकारचा निषेध


कामगारांच्या देशव्यापी संपात शिवसेना सहभागी, करणार मोदी सरकारचा निषेध
SHARES

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी ८ जानेवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात शिवसेना देखील सहभागी होणार आहे. यामुळे या संपाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने यासंदर्भात माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषेदत डाव्या पक्षांच्या नेत्यांसोबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक देखील उपस्थितही उपस्थित होते.

यावेळी राऊत म्हणाले, मोदी सरकार जनतेला २ कोटी नोकऱ्या देणार होते. परंतु प्रत्यक्षात देशातील ५ कोटी नोकरदार बेरोजगार झाले आहेत. डाॅलरच्या तुलनेत रुपया मजबूत करण्याचं भाजप सरकारने आश्वासन दिलं होतं. पण या सरकारने रिझर्व्ह बँकेचे १ लाख ६७ हजार कोटी रुपये ओरबाडून घेतले.

कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तसंच या संपात सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लाॅईज फेडरेशन, सर्व बँका, एलआयसी, जीआयसी, पोर्ट ट्रस्ट, डिफेन्स, सिव्हिल एव्हिएशन, बीएसएनएल, एमटीएमएन, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगार संघटना देखील सहभागी होणार आहेत. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा