Advertisement

हळदी-कुंकू समारंभातून मतांवर निशाणा


हळदी-कुंकू समारंभातून मतांवर निशाणा
SHARES

प्रतीक्षानगर - येथील रघुनाथ चव्हाण उद्यानात रविवारी शिवसेनेच्या वतीनं महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्तानं लकी ड्रॉ, करमणुकीचे कार्यक्रमही झाले. चित्रपटांतली गाणी सादर करण्यात आली. उपस्थित महिलांना एक चिठ्ठी देण्यात आली. त्यावरील क्रमांकानुसार लकी ड्रॉमध्ये ज्यांचे नंबर आले, त्यांना पैठणी, सोन्याची नथ, चांदीचे पैंजण, डोसा तवा, मिक्सर, इस्त्री, कुकर अशी आकर्षक बक्षिसं देण्यात आली. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतली भारती पाटील या अभिनेत्रीचीही या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. या वेळी शिवसेना शाखा क्र. 173चे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा