Advertisement

साहेब, यांच्यावर कारवाई होणार का?, सामनातूनच युवराजांच्या आदेशाला हरताळ


साहेब, यांच्यावर कारवाई होणार का?, सामनातूनच युवराजांच्या आदेशाला हरताळ
SHARES

राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे होर्डिंग्स म्हटले की या होर्डिंगवर राव, दादा, भाई, भाऊ विशेषणांची जंत्री वाचायला मिळते. शिवसेनेतही भाई आणि भाऊंची मोठी रेलचेल. यापुढे कुठल्याही होर्डिंग वा बॅनरवर दादा, भाऊ, साहेब अशी विशेषणं लावू नयेत, असे आदेश युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यावर कार्यकर्त्यांना दिले होते. यामुळे शिवसेनेतील 'भाईगिरी' संपणार असं वाटलं होतं. पण युवराजांच्या आदेशाला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामानातूनच हरताळ फासण्यात आला आहे.


आदेश काय?

शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी नवा नियम जारी केला. होर्डिंगवर यापुढे भाऊ, दादा, भाई, साहेब, राव अशी विशेषणं लावायची नाहीत, अशी तंबी आदित्य यांनी दिली. मात्र शुक्रवारच्या सामनात चक्क पहिल्या पानावर आदित्य यांना दिलेल्या शुभेच्छामध्ये आदित्य 'साहेब' असा उल्लेख करण्यात आला आहे. कामगार सेनेतर्फे या शुभेच्छा नववनियुक्त नेत्यांना देण्यात आल्या आहेत.


कारवाई होणार?

कुणाच्या होर्डिंग किंवा बॅनवर अशा प्रकारची विशेषणं दिसली. संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदित्य यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. होर्डिंगबाबत युवासैनिकांना सक्तीचे आदेश दिले आहेत, तोच नियम शिवसैनिकांनाही लागू असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या आदेशाचं उल्लंघन पाहता शुभेच्छुकांवर कारवाई होणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा