Advertisement

शिवसेनेचे परळचे पहिले शाखाप्रमुख विजय गावकर यांचे निधन

शिवसेनेच्या स्थापनेच्या काळात लालबाग-परळमध्ये संघटना वाढीसाठी गावकर यांनी मोठे प्रयत्न केले होते.

शिवसेनेचे परळचे पहिले शाखाप्रमुख विजय गावकर यांचे निधन
SHARES

शिवसेनेचे परळचे पहिले शाखाप्रमुख व माजी नगरसेवक विजय गावकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. ते अविवाहित होते.  गावकर यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवसेनेच्या स्थापनेच्या काळात लालबाग-परळमध्ये संघटना वाढीसाठी गावकर यांनी मोठे प्रयत्न केले होते. शिवसेनेच्या सर्व प्रकारच्या आंदोलनात गावकर यांचा मोठा सहभाग होता.

सन १९६८ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत ते शिवसेनेतर्फे निवडून आले होते. १९७९ पर्यंत ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आरोग्य समितीचे अध्यक्ष व शिक्षण समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले.

अंत्यसंस्काराला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू राहुल जयदेव ठाकरे, ज्येष्ठ शिवसैनिक शाम देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम, स्थानीय लोकाधिकार समितीचे उल्हास बिले, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे प्रकाश वराडकर हजर होते.

शाम देशमुख आणि कुमार कदम यांनी गावकर यांनी शिवसेनेच्या प्रारंभाच्या काळात घेतलेल्या मेहनतीची माहिती सांगितली. यावेळी परळ, शिवडी, लालबाग भागातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. खासदार अरविंद सावंत, माजी नगरसेविका सिंधुताई मसूरकर, सचिन पडवळ, कबड्डीपटू जया शेट्टी, चंद्रकांत भारती, आमदार कालिदास कोळंबकर, माजी आमदार दगडू सकपाळ, बाबुराव खोपडे आदींनी गावकर यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.



हेही वाचा

एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारात रामदास आठवलेंच्या पक्षालाही मंत्रिपद हवे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा