संघटनांत सुसुत्रतेसाठी शिवसेनेचं पाऊल

 Pali Hill
संघटनांत सुसुत्रतेसाठी शिवसेनेचं पाऊल

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ऑटो रिक्षा, टेम्पो, ट्रक, टॅक्सी, बस, रुग्णवाहिका, घनकचरा वाहतूक, बंदर क्षेत्रातील क्रेन आणि अवजड वाहनं, पर्यटन वाहनं, माथाडी ट्रान्सपोर्ट आदी व्यावसायिक आणि कामगारांच्या सर्व संघटना बरखास्त केल्या आहेत. शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते हाजी अराफत शेख यांच्या नेतृत्वाखाली या सर्व संघटना शिव वाहतूक सेनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

शिवसेना पुरस्कृत वाहतूक आणि माथाडी विभागांमध्ये सुसूत्रता असावी आणि शिस्तीनं कामकाज व्हावं या हेतूनं उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. बरखास्त केलेल्या सर्व संघटनांना पुढील कामकाजाच्या दृष्टीने शेख यांच्याशी संपर्क साधण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Loading Comments