Advertisement

शिवाजी तलाव शेडवरून राजकारण पेटले


शिवाजी तलाव शेडवरून राजकारण पेटले
SHARES

भांडुप - भांडुपची प्राचीन ओळख असलेल्या शिवाजी तलावावरून शिवसेना आणि मनसेच्या दोन दिग्गजांमध्ये पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे. शिवाजी तलावाजवळ शिवसेना आमदार अशोक पाटील यांच्या आमदार निधीतून निवारा शेडचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र ही शेड अनधिकृत असल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी केला आहे.
अनेक वर्षांपासून शिवाजी तलाव झोपडपट्ट्यांच्या विळख्यात होते. या तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिशिर शिंदे आणि मनसेच्या तीन नगरसेवकांनी सतत पाठपुरावा केला. या परिसरातील झोपड्यांचे स्थलांतर करून, रस्ता रुंदीकरण करत येथे सुशोभित गार्डन उभारले. त्यामुळे आपच्या प्रयत्नामुळेच शिवाजी तलावाने मोकळा श्वास घेतल्याचा दावा शिंदे करत आहेत. "सवंग लोकप्रियतेसाठी सेनेचे आमदार अशोक पाटील यांनी आमदार निधीतून निवारा शेड उभारली आहे. त्यापेक्षा त्यांनी लोकोपयोगी विकास काम करणे गरजेचे होते. ही शेड अनधिकृत आहे. ती पाडण्यासाठी मनसे प्रयत्न करणारच", असे मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
आमदार अशोक पाटील यांनी निवारा शेड उभारल्याने मनसेचा जरी तिळपापड झाला असला तरी सेनेने कार्यक्रम घेत या शेडचे लोकार्पण केले आहे. या शेडमुळे २० वर्षांनी पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतलेल्या शिवाजी तवालाचा श्वास गुदमरू लागल्याचे पोस्टर फेसबुकवरून व्हायरल होत आहे. त्यामुळे येत्या काळात या शेडवरून दोन्ही पक्षात वातावरण तापण्याची चिन्हे आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा