Advertisement

शिवसेना-भाजपा एकत्रित निवडणूक लढवणार, मुनगंटीवार यांचा दावा

कुणी काहीही म्हणो मात्र, आगामी निवडणूक शिवसेना-भाजपा एकत्रितच लढणार, असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केला. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी हे राजकीय वक्तव्य केलं.

शिवसेना-भाजपा एकत्रित निवडणूक लढवणार, मुनगंटीवार यांचा दावा
SHARES

शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये काय छापून येतं याकडं लक्ष देऊ नका, आमचे आम्ही बघू. कुणी काहीही म्हणो मात्र, आगामी निवडणूक शिवसेना-भाजपा एकत्रितच लढणार, असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केला. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी हे राजकीय वक्तव्य केलं. आगामी निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा शिवसेनेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मुंगंटीवार यांनी केलेला दावा म्हणजे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.


एकत्र स्मारकाचं उद्घाटन करू

अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना, ''शिवसेना-भाजपा सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरु झालं असून भविष्यात आमच्या काळातच या पूर्ण झालेल्या स्मारकाचं उद्घाटन होईल'', असं मुनगंटीवार म्हणाले.



विरोधकांच्या आशा पल्लवित

उत्तरप्रदेशच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. याच आत्मविश्वासाने काही लोकांना पुन्हा मंत्री व्हायची घाई झालेली आहे, असं राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांना उद्देशून मुनगंटीवार म्हणाले. पण सत्तेत आम्हीच येणार असा दावा त्यांनी केला. त्यावर विरोधी पक्षाकडून शिवसेना सोबत असंल का? असा प्रश्न करण्यात आला.


तुमचा गैरसमज होतोय

या प्रश्नाला उत्तर देताना ''सामना वाचून वाचून तुमचा गैरसमज होतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने १९९९ मध्ये वेगळं लढू असं म्हणत एकत्रच निवडणूक लढवली होती. मागच्या वेळी तुम्ही देखील वेगवेगळे लढला होतात, पण आता तुम्हाला गरज आहे म्हणून एकत्र आला आहात. आमच्यात काहीही झालं तरी आमचं आम्ही बघून घेऊ आणि पुन्हा सत्तेत येऊ'' असं मुनगंटीवार म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा