'या' शिवसेना नगरसेवकांची समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड

मुंबई महापालिकेच्या आरोग्य समिती, स्थापत्य शहर आणि उपनगरे समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनुक्रमे डॉ. अर्चना भालेराव, अरुंधती दुधवडकर आणि साधना माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी या पदासाठी अर्ज न भरल्याने शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

  • 'या' शिवसेना नगरसेवकांची समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड
  • 'या' शिवसेना नगरसेवकांची समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड
SHARE

मुंबई महापालिकेच्या आरोग्य समिती, स्थापत्य शहर आणि उपनगरे समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनुक्रमे डॉ. अर्चना भालेराव, अरुंधती दुधवडकर आणि साधना माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी या पदासाठी अर्ज न भरल्याने शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. केवळ निवडणुकीची औपचारिकता पार पाडून त्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.१६ एप्रिलला होणार निवडणूक

महापालिकेच्या आरोग्य समिती, स्थापत्य शहर समिती आणि स्थापत्य उपनगरे समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या सोमवारी १६ एप्रिल रोजी होत आहे. या पदासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख होती. यासाठी आरोग्य समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या डॉ. अर्चना भालेराव आणि उपाध्यक्षपदासाठी समाधान सरवणकर यांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिका उपचिटणीस रजनीकांत संख्ये यांच्याकडे सादर केले.विरोधकांचे अर्जच नाहीत

स्थापत्य शहर समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या अरुंधती अरूण दुधवडकर, तर उपाध्यक्ष पदासाठी अमेय अरूण घोले यांनी, तर स्थापत्य उपनगरे समिती अध्यक्षपदासाठी साधना माने आणि उपाध्यक्ष पदासाठी दीपमाला बढे यांनी आपले उमेदवारी अर्ज उपचिटणीस रजनीकांत संख्ये यांच्याकडे सादर केले. परंतु, संध्याकाळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेपर्यंत विरोधी पक्षाकडून कोणत्याही उमेदवाराने अर्ज न भरल्याने या सर्वांची बिनविरोध निवड झालेली आहे. याची अधिकृत घोषणा सोमवारी १६ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीत केली जाणार आहे.हेही वाचा

अहो आश्चर्यम्! मुंबई महानगर पालिकेत इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!


संबंधित विषय
ताज्या बातम्या