निकालानंतर सर्वांची बुबुळं बाहेर येतील - संजय राऊत

  Sena Bhavan
  निकालानंतर सर्वांची बुबुळं बाहेर येतील - संजय राऊत
  मुंबई  -  

  दादर - मुख्यमंत्र्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सेनाभवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदते केला. छातीवर कमळाचं चिन्ह लावून सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यानी मुलाखतींचा धडाका लावलाय हा सरकारी अधिकारांचा गैरवापर असल्याचे सांगत मुख्यमंत्री फक्त भाजपाचे नाहीत तर ते आख्ख्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचा त्यांना कदाचित विसर पडल्याची टीका राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.

  आचारसंहिंता सुरु असताना मुख्यमंत्र्यांना माध्यमांना मुलाखत देण्याची परवानगी मिळत असेल तर सर्वांना परवानगी मिळायला हवी. सरकारी यंत्रणा वापरून मुख्यमंत्री विरोधकांना धमकावत आहेत. पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्यांना राजकारणातली ही पारदर्शकता दिसत नाही का ? असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला. दिवसभर सुरु असलेल्या मुलाखती या पेड न्यूजचा प्रकार असावा असा आम्हाला संशय असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

  प्रचाराची वेळ संपल्यानंतर कोणीही प्रचार करू नये असा नियम आहे. मात्र वेळ संपल्यांनंतरही मुख्यमंत्र्यानी मुलाखती दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा प्रकार म्हणजे मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे याची रितसर तक्रार केल्याचं राऊतांनी यावेळी सांगितलं. तसेच आकडे लावणे ही आमची पद्धत नाही असा टोलाही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. भाजपाच्या नेत्यांना मतांसाठी बाळासाहेबांचं नाव घ्यावच लागेल. बाळासाहेबांमुळेच भाजपा मोठी झाली आहे. सोशल मीडियावर आमच्या खोट्या सह्या दाखवून जनतेची दिशाभूल केली जाते. शिवसेनेची प्रचार मोहीम अत्यंत पारदर्शक आहे. तसेच २३ तारखेच्या निकालानंतर सर्वांची जीभ हातभर आणि बुभुळं बाहेर येतील असा आत्माविश्वास देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.