SHARE

महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, मंगळवारी याचिकांवर आदेश देण्यात येणार आहेत. असं असताना शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीनं सोमवारी संध्याकाळी शक्तिपरीक्षेची रंगीत तालीम घेतली. तसंच, ‘आम्ही १६२’ असं सांगत आम्ही एकत्र असल्याचं स्पष्ट केलं.


शिवसेनेची भूमिका

या शपथविधीनंतर मागील अनेक दिवस पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. '१६२ आणि अधिक…वेट अ‍ॅण्ड वॉच' असं ट्विट संजय राऊत यानी केलं आहे.

एकजुटीची शपथ

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी १६२ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सादर केलं. त्यानंतर आमदारांना ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलात एकजुटीची शपथ देण्यात आली.हेही वाचा -

महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात फैसला

अजित पवारांशी कोणताही संबंध नाही- धनंजय मुंडेसंबंधित विषय
ताज्या बातम्या