शिवडी-वडाळ्यातले शिवसैनिक नाराज

 Parel
शिवडी-वडाळ्यातले शिवसैनिक नाराज

परळ - महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र, शिवडी आणि वडाळा मतदार संघातील स्थानिक प्रतिनिधित्व करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना डावलून इतर उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याने या मतदार संघांतील पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर वडाळा शाखा 178 येथे शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. शिवडीतील प्रभाग 204 या शाखेला देखील सायंकाळी टाळं लावण्यात आलं. उप शाखाप्रमुख किरण तावडे यांना तिकीट देण्याऐवजी शाखाप्रमुख अनिल कोकीळ यांना प्रभागातून उमेदवारी देण्यात आली. याच विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी शाखेबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली.

यावर शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असं सांगितलं. तोडगा लवकरात लवकर काढला नाही तर पुन्हा निषेध व्यक्त करण्यात येईल अशा संतप्त प्रतिक्रीया या वेळी शिवसैनिकांनी दिल्या.

Loading Comments