Advertisement

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानं बंद

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या एमजी रोडवरील फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानं बंद करण्यात आली.

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानं बंद
SHARES

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या एमजी रोडवरील फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानं बंद करण्यात आलीत. फॅशन स्ट्रीटवरील दुकानदारांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानापासून मंत्रालयाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केलाय. मंत्रालयाकडून इस्टर्न एक्सप्रेस हायवे, काळबादेवी रोड, मरीन लाईन्स स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलाय. दोन्ही रस्त्यावर पोलिसांची बॅरिकेटिंग आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात केलाय.

दीड किलोमीटरपर्यंत रस्त्याला लागून असलेल्या दुकानदारांना शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. दुकानदारांचा हा निर्णय ऐतिहासिक समजला जातोय. तिन्ही कायदे मोदी सरकांने परत घ्यावेत, आम्हीही शेतकऱ्यांचीच लेकरं आहोत हे कायदे रद्द झालेच पाहिजेत, असा पवित्राही फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानदारांनी घेतलाय.हेही वाचा

शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण…; शरद पवार संतापले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा