कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी चेंबूरकर एकवटले

Chembur

See all
मुंबई  -  

रॉचे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. 

त्यानंतर त्याचे पडसाद सगळीकडे उमटू लागले आहेत. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सामान्य जनताही जाधव यांच्या सुटकेसाठी आता रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे.

चेंबूरमध्येही भाजपा नगरसेविका आशा मराठे यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेत चेंबूरकरांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेत कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडवण्याची मागणी केली आहे. यावेळी नागरिकांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी देखील केली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.