Advertisement

शीव प्रतीक्षा नगर पोटनिवडणूक : मतदान केवळ ४० टक्के!

निवडणुकीत संध्याकाळपर्यंत एकूण ४० टक्के मतदान झाले असून शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे भवितव्य या मतपेट्यांमध्ये बंदिस्त झाले आहे. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सकाळी दहा वाजता जोगळेकरवाडी महापालिका शाळेत पार पडणार आहे.

शीव प्रतीक्षा नगर पोटनिवडणूक : मतदान केवळ ४० टक्के!
SHARES

मुंबईतील प्रभाग क्रमांक १७३चे शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर शुक्रवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत संध्याकाळपर्यंत एकूण ४० टक्के मतदान झाले असून शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे भवितव्य या मतपेट्यांमध्ये बंदिस्त झाले आहे. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सकाळी दहा वाजता जोगळेकरवाडी महापालिका शाळेत पार पडणार आहे.


प्रमुख लढत सेना वि. काँग्रेस

प्रतीक्षानगरच्या प्रभाग १७३मधील पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून सुनील शेट्ये आणि शिवसेनेकडून रामदास कांबळे हे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय गौतम झेंडे हे अपक्ष उमेदवार आहे. मात्र, यामध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्येच प्रमुख लढत आहे.


४० टक्के मतदान

शुक्रवारी झालेल्या मतदानाच्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला असून सकाळी साडेनऊ वाजता केवळ ८ टक्केच मतदान झाले होते. तर सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाचा हा टक्का ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. एकूण ३२ हजार ८५१ मतदारांपैकी १३ हजार १७० मतदारांनीच या मतदानात भाग घेतला. यामध्ये ७ हजार ९९ पुरुषांनी तर ६ हजार ७० महिलांनी आणि इतर एक याप्रमाणे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.


शिवसेनेने घातलं विशेष लक्ष

ही पोटनिवडणूक शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असली तरी शिवसेनेचे नेते, सचिव आदी मंडळी या मतदार संघात गुरुवारपासूनच ठाण मांडून आहेत. त्यामुळे शिवसेनेने कुठेही दुर्लक्ष होणार नाही याची विशेष काळजी घेतली, तर काँग्रेसनेही विजयाच्या दृष्टीने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे.

या निवडणुकीत १० हजारांच्या मताधिक्यांनी आपला उमेदवार निवडून येणार असल्याची घोषणा शिवसेनेचे विभागप्रमुख मंगेश सातमकर यांनी केली आहे. तर या निवडणुकीत परिवर्तन घडून येईल, असा विश्वास महापालिका विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नगरसेवक रवी राजा यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे परिवर्तन होतंय की शिवसेना अधिक मताधिक्यांनी निवडून येतेय, हे शनिवारीच मतपेटी उघडल्यावर स्पष्ट होईल.हेही वाचा

...तरीही महापालिका सभागृह नेतेपद रिक्तच


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा